सॅम्यूएल बेकेटच्या शैलीमध्ये एकाच वेळी कल्पित गूढाच्या पलीकडची वास्तवाची जाणीव आणि माणसाच्या आयुष्याचा फोलपणा दाखवण्याचे कसब आहे!
सगळा विस्कटलेला खेळ. बुद्धिबळातले सगळे सैन्य, प्यादी, घोडे, हत्ती मरून गेलेत. पैशाने सर्वांत श्रीमंत असलेला हा राजा तडफडतोय या पराजयातून वाचण्यासाठी. बुद्धिबळातल्या राजाला एकच घर इकडे-तिकडे जाण्याची मुभा असते. हॅमची हालचाल अशीच मर्यादित आहे, त्याच्या चाकांच्या खुर्चीपुरती. त्याचे जिवंत असणे, पाहणे, हे त्याचा मृत्यू बघण्यासारखेच आहे. मृत्यूकडे जाणारी गती फार क्लेशदायक आहे.......